'सर्वसामान्यांंचा विकास हाच आपल्या मनाचा ध्यास’ हा विचार मनात घेऊन गावातील सर्वसामान्याना सोबत घेऊन संस्थेचे संस्थापक यांनी सामान्य भिशीच्या रुपात असणाऱ्या या इवलेसे रोपट्याला दि. ०१/०१/१९९० रोजी “सर्वोदय पतसंस्था” या नावाने लावली. संस्थापकाबरोबर असणारे सेवाभावी कार्यकर्ते, संचालक, विश्वासू आणि जाणते सभासद, कुशल व्यवस्थापन, कार्यप्रणव असे कर्मचारी, शाखेच्या माध्यमातून काम पाहणारे सल्लागार सदस्य अशा अनेक विविध सहकार्याने संस्थेच्या अर्थकारणाची वाटचाल ही प्रगतीकडे आहे.
संपूर्ण कोल्हापूर व सांगली असे दोन जिल्हा कार्यशेत्रातून एकूण १८ शाखा व प्रधान कार्यालयाच्या माध्यमातून काम करीत असताना सन २००५, २००८, २०१९ ते २०२१ च्या महापूर, कोरोना सारख्या संकटातसुध्दा व N.P.A. च्या निकषातून विनम्र व तत्पर ग्राहक सेवा देऊन संस्थेच्या विकासासाठी व व्यवसाय वाढीसाठी म्हणून विधायक व विकास कामे चालू आहेत.
समाजातील सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी, शेतमजुर, व्यापार व लघुउद्योजक यांच्या गरजा तसेच त्यांना बचत व काटकसरीचे सवय लागावी या उद्देशाने संस्थेची स्थापना केली.
सहकारातील तत्त्वनिष्ठ जपताना दैनंदिन कामकाजा बरोबर विधायक उपक्रमाची जोड म्हणून शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, आरोग्य, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण व सहकार्याला सहकाराची जोड यासारख्या गोष्टी एक अर्थपूर्ण संकल्पना संस्थेच्या माध्यमातून समाजासमोर आणला आहे. पतसंस्थेच्या व्यवहाराबरोबर समाजकारणाला सुद्धा तितकेच प्राधान्य दिले आहे.
